दारूच्या नशेत तरुणींनी सिक्युरिटी गार्डसोबत केले असे काही…
हायप्रोफाईल सोसायटीत तरुणींच्या धिंगाण्याचा व्हिडिओ व्हायरल
दिल्ली दि ८(प्रतिनिधी)- सोशल मीडियामुळे अनेकांना चांगले वाईट प्रकार अनुभवास आले आहेत. तर या सोशल मिडीयावर अनेक प्रकारचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात सध्या एक तरूणीने दारूच्या नशेत सिक्युरिटी सोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
नोएडातील हायप्रोफाईल सोसायटीतला हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे.व्हिडिओत एक महिला सिक्युरिटीची काॅलर पकडून शिवीगाळ करताना दिसत आहे. यावेळी व्हिडिओ शुट करणाऱ्यांसोबत देखिल ती गैरवर्तन करत आहे. सेक्यूरिटी गार्डने सोसायटीचे स्टिकर नसलेली कार गेटवर थांबवली त्यामुळे तरुणींने गोंधळ घातला आहे. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तरुणींना ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर गाडीची आवश्यक कागदपत्र नसल्याने त्यांना दंड देखील आकारण्यात आला आहे.
शुक्रवारी रात्री देखील असाच काहीसा प्रकार समोर आला होता. नोएडातील एका हायप्रोफाईल सोसायटीत दोन मुलींनी दारू पिऊन, गार्डसोबत शिवीगाळ आणि गैरवर्तन करून गोंधळ घातला. रात्री उशिरापर्यंत मुलींचा हा गोंधळ सुरु होता. नेटक-यांनी या मुलींना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.