मुंबई दि ११(प्रतिनिधी)- मुंबईची लोकल आणि भांडण हे एक समीकरण झाले आहे.पण नेरुळ लोकलमध्ये महिलांच्या भांडणानंतर मुंबईची लाइफलाइन लोकलमध्ये पुन्हा एकदा महिलांमध्ये जोरदार राडा झाला आहे. या राड्यात महिलांचे दोन गट आपापसात तुफान भिडले आहे.याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
राडा झालेली लोकल विरारहून दादरकडे येत होती. यावेळी सकाळी गर्दीच्या वेळी महिलांच्या डब्यात जोरदार राडा झाला.लोकल भायंदर आणि दादरच्या दरम्यान आलेली असताना महिलांमध्ये मारामारी झाली व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे महिलांचे दोन ग्रुप पहिल्यांदा मोठ्या आवाजात बोलत असतानाच अचानक मारामारी चालू करतात. या भांडणाचं कारण अद्यापतरी कळलेलं नाही. लोकलच्या डब्यात मारामारी हा प्रकार नवीन नसला तरीही अलीकडे महिलांच्या डब्यातील मारामारी वारंवार समोर येत आहे. तसेच नवरात्र काळातही महिलांमध्ये मारामारीच्या घटना घडल्या होत्या. त्याचेही व्हिडिओ व्हायरल झाले होते.
काही दिवसांपूर्वीच नेरुळ पनवेलच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची हाणामारी झाली होती. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायलर झाला होता. सीटवर बसण्यावरुन हा वाद झाला होता. मात्र या घटनेमुळे लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.