…म्हणुन कव्वालीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार
इस्लापूरातील गोळीबारचा व्हिडिओ व्हायरल, गोळीबारात 'या' पक्षाचा नेता
सांगली दि १४(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरला तालुक्यात एका कव्वालीच्या कार्यक्रमात व्यासपीठावरुन हवेत गोळीबार केल्याचा प्रकार व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. इस्लामपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी ईद-ए-मिलाद निमित्त कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने हा गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मिळालेली माहिती अशी की ईद ए मिलादुनबीनिमित्त येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पीरअली पुणेकर विश्वस्त असलेल्या ख्वाजा गरीब नवाज सोशल वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण कव्वालीचा कार्यक्रम सुरू असताना एका व्यक्तीने व्यासपीठावरून हवेत गोळीबार केला गोळीबार केलेला व्यक्ती हा राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक आहे. व्यासपीठावरून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पण जयंत पाटील गेल्यानंतर हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही.
राष्ट्रवादीचे हे माजी नगरसेवक नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात. पूर्वीच्या वादातून मोमीन मोहल्ला परिसरातील पक्षाचे कार्यालय फोडण्यात आले होते. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कव्वालीच्या मंचावरूनच या माजी नगरसेवक यांनी हवेत गोळीबार करण्यात आला. त्यामुळे आता इस्लामपूर पोलीस याची नोंद घेऊन तपास करत कारवाई करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.