पाठकबाई राणादा एकमेकांबरोबर दिसले रोमँटिक अंदाजात
दोघांच्या केमिस्ट्रीचा व्हिडिओ जोरात व्हायरल,एकदा बघाच
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील पाठकबाई आणि राणादा म्हणजेच चाहत्यांचे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. पण त्या आधीच ते चर्चेत आले आहेत.कारण एका शेअर केलेल्या व्हिडिओमुळे ते चर्चेत आले आहेत. तशीच त्यांच्या केमिस्ट्रीची चर्चा होत आहे.

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीनं इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते दोघे ‘लाल इश्क’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. अक्षया आणि हार्दिकने सुरुवातीला पंजाबी ड्रेस आणि टीशर्ट, ट्रॅक पॅण्टमध्ये दिसतो आहे. पण अचानक ते दोघे ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसत आहे. या दोघांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूप आवडते, पण त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप भावते. आता हे दोघे खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे लाइफ पार्टनर होणार आहेत.
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीने त्यांच्या मित्रपरिवार आणि कुटुंबीयांसोबत केलेल्या केळवणाचेही फोटो समोर आले होते तसेच अक्षयाने बॅचलर पार्टीत केलेल्या लुंगी डान्सची देखील भरपूर चर्चा झाली होती. त्यांचे अनेक कार्यक्रमाचे फोटो समोर आले असले तरी त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप समजू शकलेले नाही. त्यांचे चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहीली आहे.