
मुंबई विशेष प्रतिनिधी – राज्यातील सत्तासंघर्षात महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले असून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या युतीचे सरकार स्थापन होण्यासाठी वेगवान हलचाली सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे समर्थक 50 आमदारांचा गट आणि भाजपा मिळून नवे सरकार स्थापन करणार आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी १४४ हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे…शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक ५० आमदार आणि भाजपचे समर्थक ११४ आमदार असे मिळुन १६४ आमदारांचे बहुमत विधान सभेत सिद्ध करून राज्यात भाजप+शिवसेना ( शिंदे गट ) असे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत.
सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरू
शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आणखीही काही आमदार शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याचं समोर येत आहेत. अशात आता नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेच्या शिंदे गटाची आमदार संख्या पन्नासवर पोहोचणार आहे. संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे आपल्या या शिवसेना गटाचं पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर भाजप राज्यपालांना पत्र लिहून सरकार स्थापनेचा दावा करेल. नव्या सोमवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे, शिवसेनेचे अनेक बडे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसला आहे.