पत्नीला आम्लेट बनवता येत नाही म्हणून पतीचे भयानक कृत्य
हवालदार पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, बघा नक्की काय झाल?
पुणे दि २१(प्रतिनिधी)- पत्नीला ऑमलेट निट बनवता येत नाही म्हणून तिचा गळा दाबून खूनाचा प्रयत्न केल्याचा व मुलगा सोडविण्यासाठी गेल्यानंतर त्याला लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे एका हवालदाराने हे कृत्य केले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी त्या हवालदाराला बेड्या ठोकल्या आहेत.
मनिष गौड हा पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. आंबेगाव बुद्रुक येथील दत्तविहार सोसायटीमध्ये तो आपल्या परिवारासह राहतो. घटनेच्या दिवशी मनिष यांच्या पत्नीने बनवलेले ऑमलेट खात होता पण बनविलेल्या ऑमलेटमध्ये काहीतरी चुक झाल्यामुळे मनिषने रागाने तुला ऑमलेट नीट बनवून देता येत नाही का? म्हणत शिवीगाळ करत फ्रिजवर ठेवलेली इलेक्ट्रॉनिक पक्कड उचलून पत्नीच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर गळा दाबत खुनाचा प्रयत्न केला. हे सर्व सुरू असतानाही त्यांचा मुलगा भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडला असता त्यालाही लाथा बुक्क्यांनी मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली.
पत्नीने पोलिसात तक्रार झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एका हवालदारानेच क्षुल्लक कारणामुळे पत्नीला आणि मुलाला बेदम मारहाण केल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.