घटस्फोटानंतर यो यो हनी सिंग या अभिनेत्रीच्या प्रेमात
एका ब्रेसलेटमुळे प्रेयसीचे नाव समोर, पहा कोण आहे ती अभिनेत्री
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- यो यो हनी सिंग भारतातल्या टॉप रॅपर्सपैकी एक आहे. त्याने अनेक धमाकेदार गाणी गायली आहेत. तो सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. त्याने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याने कोणाचा तरी हात हातामध्ये घेतला असल्याचे लक्षात येते. त्यामुळे तो पुन्हा एकदा एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याची चर्चा रंगली आहे.

हनी सिंग मध्यंतरी त्याची पत्नी शालिनी तलवार बरोबर घेतलेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आला होता. शालीनीने हनी सिंगकडे तब्बल १० कोटी रुपयांची पोटगी मागितली होती. पण न्यायालयाने त्याला १ कोटी रुपये पोटगी म्हणून देण्याचे आदेश दिले होते. या काळामध्ये त्याचे खासगी आयुष्य खूप चर्चेत होते. शालीनीबरोबर त्याने २०११ मध्ये लग्न केले होते. तेंव्हापासून तो सिंगल होता. पण आता त्याने इनस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हनी सिंगने या फोटोला आता “जे काही आहे ते फक्त तुझ्या-माझ्यामध्ये आहे. ‘टुगेदर फॉरेव्हर’ हे आमचे गाणे लवकरच प्रदर्शित होणार आहे”, असे कॅप्शन दिले आहे. यात त्याने एका मुलीचा हात हातात घेतला आहे. पोस्ट केलेल्या फोटोमधला हात त्याच्या नवीन प्रेयसीचा असल्याच्या चर्चा रंगली आहे. फोटोमध्ये तिचा चेहरा दिसत नसला, तरी हातामधल्या ब्रेसलेटवरुन हा हात मॉडेल आणि अभिनेत्री टीना थडानीचा आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण टीनानेही काही दिवसापूर्वी एक फोटो शेअर केला होता त्यात ही अशाच प्रकारचे ब्रेसलेट दिसले होते. पण दोघांनी अजून त्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. पण बी टाउनमध्ये मात्र ते दोघे डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.
हनी सिंगच्या ‘पॅरिस का ट्रिप’, ‘टुगेदर फॉरेव्हर’ या गाण्यांमध्ये टीना झळकली आहे. ही गाणी रसिकांना आवडली देखील होती. टीना थडानी माॅडलिंग बरोबर अभिनेत्री देखील आहे हनी आणि टिना गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या फोटोवर कमेंट आणि लाइक करताना दिसत आहेत.त्यामुळे ते एकमेकांच्या प्रेमात असल्याची चर्चा रंगली आहे.