मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाला पूर्णविराम मिळेल असे वाटत असतानाच आता नव्याने त्यांच्यात वाद सुरु झाला आहे. रवी राणा यांनी घरात घुसून मारण्याची भाषा केल्याने बच्चू कडू समर्थकही आक्रमक झाले आहेत. पण या वादात आता नवनीत राणांनी पती रवी राणांची साथ सोडल्याचे दिसत आहे.
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादावर रवी राणांच्या पत्नी नवनीत राणा यांनीही यावर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या “मला त्या विषयावर काही बोलायचे नाही. हा माझा विषय नाही. माझ्यासाठी माझं काम महत्त्वाचं असून, मी त्यासाठी मुंबईला जात आहे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. ज्याप्रमाणे ते बोलतात त्यापमाणे आम्ही करतो, तसेच मी घरी त्यांची पत्नी आहे, पण बाहेर सेवक आहे,” असं सांगत त्यांनी वादावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला आहे. दरम्यान आमदार बच्चू कडू आमदार रवी राणा यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादावर जिल्ह्यातील नागरिकांदेखील नाराजी व्यक्त केली आहे.
रवी राणा यांनी पुन्हा एकदा बच्चू कडू यांना घरात घुसून मारण्याची थेट धमकी दिली आहे. या वादानंतर रवी राणा हे मुंबईला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी निघाले आहे. तर नवनीत राणा सुद्धा मुंबईकडे निघाल्यात यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राणांनी बोलण्याचं टाळल आहे. पण त्यांनी या मुद्द्यावर पतीची साथ सोडल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे