
‘झिम्बाब्वेने भारताला हरवल्यास झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेन’
पाकिस्तानच्या 'या' अभिनेत्रीची खुली आॅफर, अजून काय म्हणाली अभिनेत्री
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- सध्या सगळीकडे टी २० विश्वचषकाचा थरार पहायला मिळत आहे. त्यातच पाकिस्तानला सेमी फायनला पोहोचण्यासाठी विजयी होण्याबरोबरच झिम्बांबेने भारताला पराभूत करावे लागणार आहे. अशातच भारताला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानच्या एका अभिनेत्रीने झिम्बाब्वेला एक खुली ऑफरही दिली आहे.
पाकिस्तानची अभिनेत्री सेहर शिनवारीने याबाबत एक ट्विट केले आहे.”झिम्बाब्वेला पुढच्या सामन्यात भारतीय संघाला हरवल्यास झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेन, अशी ऑफर तिने ट्विट करत दिली आहे. तिच्या ट्विटने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर त्यांच्या सेमीफायनलच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, सेमी फायनला पात्र ठरण्यासाठी झिम्बाब्वेला भारतावर विजय मिळवावा लागणार आहे.यासाठी पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीनेही झिम्बाब्वेला ही खुली आॅफर दिली आहे.भारतीय संघाला शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळायचा आहे. हा सामनाही सुपर-१२ मधील शेवटचा असेल. हा सामना ६ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. तर पाकिस्तान त्याच दिवशी बांग्लादेश विरुद्ध खेळणार आहे.
I'll marry a Zimbabwean guy, if their team miraculously beats India in next match 🙂
— Sehar Shinwari (@SeharShinwari) November 3, 2022
सेहर शिनवारीचा जन्म पाकिस्तानातील हैदराबाद शहरात झाला. तिने २०१४ साली ‘शेर सवा शेर’ या कॉमेडी मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने पाकिस्तानच्या मनोरंजन विश्वात खूप नाव कमावले आहे. याशिवाय ती अनेकदा सोशल मीडियावर तिच्या वायफळ बडबडीमुळे चर्चेत असते. आता तिची हि आॅफर झिम्बाब्वे स्वीकारणार का हे पहावे लागेल.