
…म्हणून संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयात केली तोडफोड
व्हिडिओ व्हायरल, तरुणीसोबत रूग्णालयात नेमके काय घडले
ओैरंगाबाद दि ५(प्रतिनिधी)- ऒैरंगाबादमध्ये एका रूग्णालयात संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. एका तरुणीवर शास्त्रक्रिया केल्यानंतर ती शुद्धीत न आल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात राडा घातला. पण वेळीच पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिडको मधील इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये एका २० वर्षीय तरुणीला पोट दुखत असल्याने दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी तिच्यावर तरुणीवर शस्त्रक्रिया केली मात्र, बराच वेळ उलटल्यावर देखील तरुणी शुद्धीवर आली नाही. यावेळी त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांकडे चोैकशी केली. मात्र,कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी आरडा-ओरड करत रुग्णालयातील काचा फोडण्यास सुरु केल्या, यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. अखेर पोलीस आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पण तोपर्यंत रूग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे.
डॉक्टरांनी तरुणीवर शस्त्रक्रिया केली होती आणि सिटिस्कॅनसह विविध तपसण्या सुरु होत्या. पण तरुणी शुद्धीवर आली नव्हती. पण विचारूनही कर्मचारी समाधानकारक उत्तरे देत नव्हते. रात्री संबंधित डॉक्टर न भेटल्याने नातेवाईक संतप्त झाले होते. त्यातून हा तिडफोडीचा प्रकार घडला आहे.