‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’
गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातील गुंडाचे थेट पोलीसांनाच चॅलेंज, पहा व्हिडिओ
नागपूर दि २२(प्रतिनिधी)- राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतः जिलह्यात म्हणजे नागपुरात गुंडांचे धाडस वाढतंय का?असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण पोलीस काही गुंडाना कोठडीत घेऊन जात असताना एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ते ‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’ असं म्हणत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे गृहविभागाचे वाभाडे निघाले आहेत.
नागपुरातील गुंडांनी थेट पोलिसांनाच चॅलेंज आहे. त्यामुळे
सामान्य नागरिक कोणाच्या भरवश्यावर राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अच्छी इंदूरकर याला नागपूर पोलिसांनी एका खुनाच्या आरोपात अटक केली आहे. साध्य तो कोठडीत आहे.
न्यायालयातील सुनावणीसाठी त्याला पोलीस वाहनात नेत असताना त्याचे दोन साथीदार पोलीस वाहनाबाहेर आले आणि त्यांनी त्याचा व्हिडिओ तयार केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.या व्हायरल व्हिडिओमध्ये गुंड ‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’ असं म्हणत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्या पोलीस व्हॅन मध्ये पोलीस बसले आहेत. इतकेच नाही तर त्याचे सहकारी त्याला ‘खर्रा हवा का’ असंही त्याचे विचारत असल्याचेच दिसत आहे. यावर तो ‘सर्व आहे’ असं म्हणतो.त्यामुळे पोलीसांच्या कार्यशैलीवर संताप व्यक्त होत आहे. पोलीसांसमोरच या गुंडाने गृह विभागाचे वाभाडे काढले आहे. त्यामुळे गृह विभागावरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आता गुन्हा दाखल केलाय, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणी आता नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या हा व्हिडीओ मात्र वेगाने सोशल मीडियात शेअर होऊ लागला आहे. यातून पोलीसांनाच चॅलेंज केले जात आहे.