Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यातील नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच

कंटेनरच्या धडकेत अनेक गाड्यांचे नुकसान, प्रशासनाची कबुली

पुणे दि २२(प्रतिनिधी)- पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या भीषण अपघाताची देशभरात चर्चा झाली. रविवारी या अपघातामध्ये एका कंटेनरने धडक दिल्याने अनेकजण जखमी झाले होते. त्यावर उपाययोजनांची चर्चा होत असताना आज पुन्हा एकदा कंटेनरचा अपघात झाला आहे. त्यामुळे पुलाच्या आराखड्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भरधाव वेगात असणारा कंटेनर रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या दुभाजकावर जाऊन धडकला. या धडकेत २ चार चाकी गाड्यांचे नुकसान झाले असून हा ट्रक कात्रज च्या दिशेने मुंबईकडे जात होता. रविवारी झालेल्या भीषण अपघातनंतर आज पुन्हा त्याच ठिकाणी हा अपघात झाला आहे. विशेष म्हणजे रविवारच्या भीषण अपघातानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. आज सकाळीच या कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. पुणे पोलिसांच्या १०० पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे. त्याचबरोबर नवले पुलावर वारंवार घडणारे अपघात व त्यामुळे होणारी जिवीतहानी टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांचा आराखडा तयार केला जाणार आहे. येत्या आठ दिवसात संबंधित आराखडा तयार करुन, उपाययोजना प्रत्यक्षात राबविण्यात भर देण्यात येणार आहे.असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले. तसेच या पुलाची रचना चुकली असल्याचं देखील एनएचएआयने मान्य केलं आहे. त्यामुळे ही अपघाताची मालिका कधीपर्यंत सुरु असणार असा प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

पुण्यातील नवले पुलावरील अपघातांची मालिका रोखण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढणे आणि रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्राच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अंतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलाविण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!