
पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या
पोलीसांनी असा लावला आरोपीचा छडा, हा पुरावा ठरला महत्वाचा
बेंगलोर दि ३०(प्रतिनिधी)- अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बेंगलोरमध्ये घडली. पोलीसांनी मोठ्या मुश्किलीने या प्रकरणाचा छडा लावत पत्नीला अटक केली. एकदा क्राईम चित्रपटाला लाजवेल अशाप्रकारे या हत्येचा कट रचण्यात आला होता.
पोलीसांनी मृत दयसगाैडाची पत्नी जयलक्ष्मी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयलक्ष्मी आणि देसगौडा यांचे लग्न १६ वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना दोन अपत्येसुद्धा आहेत. मात्र पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत होते. जयलक्ष्मीचे एका पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. तिचा पती देसगौंडा घरी नसताना तो घरी येत-जात असे. देसगौंडाला त्याच्या पत्नीवर अनैतिक संबंधावरून संशय होता. यावरूनच त्यांच्यात वाद होत होते. घटनेच्या दिवशीही देसगौंडाचा पत्नीसोबत वाद झाला. त्यामुळे दोघांनी मिळून त्याची दोरीने गळा आवळून खून केला. त्यानतंर खूनासाठी वापरलेलं साहित्य आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
पोलीसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. प्रियकराने आपण जयलक्ष्मी मोठी बहीण असल्याचं सांगितले होते. पण पोलीसांनी मोबाईल सीडीआर पडताळणी केल्यानतंर त्याला जयलक्ष्मीने कॉल केल्याचं समोर आलं होतं. मोबाईल कॉलच्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक केली असून आता अधिक तपास केला जात आहे.