Just another WordPress site

मुंबईत भर रस्त्यात तरुणाने काढली कोरियन तरुणीची छेड

संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल, पोलीसांकडून गंभीर दखल

मुंबई दि १(प्रतिनिधी) अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे.पण महाराष्ट्राची आर्थिक राजधानी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मुंबईत काही स्थानिक तरुणांनी भर रस्त्यात एका कोरियन तरुणीची छेड काढली आहे. तरुणी लाईव्ह स्ट्रिमिंग करत असल्याने घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. यामुळे महिलांना सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे.

समोर आलेल्या व्हिडिओनुसार एक तरुणी खार भागात लाइव्ह स्ट्रिमिंग करत होती. तेंव्हा एक तरुण या तरुणीच्या अगदी जवळ आला. आणि तिचा हात धरून तिला ओढण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारानंतर तरुणी घटनास्थळावरून निघून जात असताना, या तरुणाने स्कुटीवर तिचा पाठलाग केला. तुला तुझ्या घरी सोडतो, असं म्हणत हा तरुण त्या मुलीवर जबरदस्ती करत होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत:हून दखल घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत कोणीही पोलिसांकडे तक्रार केलेली नाही, मात्र तपास सुरू केला आहे.

GIF Advt

व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे त्या व्यक्तीची ओळख पटवली जात आहे. पीडित महिला दक्षिण कोरियाची नागरिक आहे. या निमित्ताने मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. पोलीसांनी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!