
दिल्ली प्रतिनिधी – दिवसेंदिवस महागाई गगनाला भिडत आहे. गॅस, पेट्रोल-डिझेल, CNG, सोने यांच्या वाढत्या दरामुळे सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे. अश्यातच आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीची बातमी समोर आली आहे. 4.2 किलो वजनाच्या सिलेंडरसाठी घरगुती लिक्विड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) ची किंमत 50 रुपयांनी वाढवण्यात आली आहे तसेच दरातील बदल आजपासून लागू होणार आहे.
याशिवाय 5 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किंमतीत 18 रुपयांनी वाढ होईल. दिल्लीत आता घरगुती एलपीजीची किंमत 1053 रुपये असणार आहे. दरम्यान, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 8.5 रुपयांनी कपात करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या एका वर्षात, दिल्लीत घरगुती LPG सिलिंडरचे दर 834.50 रुपयांवरून 1003 रुपयांपर्यंत वाढण्यात आले. 14.2 kg घरगुती LPG सिलेंडरचा दर शेवटचा 19 मे 2022 रोजी 4 रुपयांनी वाढवला होता. तर 7 मे रोजी एलपीजी सिलिंडर 22 मार्च 2022 च्या 949.50 रुपयांच्या तुलनेत 50 रुपयांनी महाग झाला होता. याशिवाय, 22 मार्च 2022 रोजीही सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली होती.