
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ आपले मनसोक्त मनोरंजन करतात. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक साधी सोज्वळ महिला अचानक असं काही रूप धारण करते की तिला बघून नेटकरीही फिदा झाले आहेत.तर तिच्या नव-याची गोची झाली आहे.
एका घरगुती समारंभातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.यात एक महिला मेरे हसबंड मुझको प्यार नहीं करते या गाण्यावर मनसोक्त नाचताना दिसत आहे. यात निव्वळ हावभाभावांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. या महिलेने सहज नाचताना तिच्या कुटुंबातील सदस्याने हा व्हिडीओ शूट केला होता. साडी नेसून अगदी छान खांद्यावर पदर घेऊन नाचताना ही महिला धम्माल एक्क्सप्रेशन देत आहे.हा व्हिडिओ अलिगडमधील असल्याचे समजते. @abhinavBebaak या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पारंपारिक वेषातही आपली कला सादर करता येते असा संदेश या महिलेने दिला आहे.
मेरे स्वीटू, मेरे शोना, मेरे मजनू, मेरे हसबैंड मुझे प्यार नही करते.. सोशल मीडिया पर जबरदस्त वायरल है.. pic.twitter.com/c6vZIQftCY
— Abhinav_bebaak (@abhinavBebaak) December 5, 2022
सोशल मीडियावर एखाद्या साध्या घरगुती कार्यक्रमात केलेला डान्स सुद्धा व्हायरल होऊ शकतो. अशा कितीतरी व्हिडीओजमधून आजवर अनेकांना प्रचंड प्रसिद्धी लाभली आहे. हा व्हिडिओही तसाच असून महिलेच्या संस्कारी आणि नटखट हावभावाचे काैतुक होत आहे.