Just another WordPress site

आपल्या प्रेमासाठी या अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट

हार्ट इमोजी शेअर करत चाहत्यांना दिले पुन्हा एकत्र येण्याचे संकेत

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉसकडे पाहिलं जाते. बिग बॉस हा रिअॅलिटी शो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. या ठिकाणी अनेक नाती बनतात आणि बिघडत असतात सध्या या कार्यक्रमात एक नवीन जोडी आकार घेताना दिसत आहे. एका अभिनेत्रीने केलेल्या पोस्टमुळे प्यारवाली लव्हस्टोरी दिसून येत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून वीणा जगताप आहे.या कार्यक्रमाद्वारे त्याने हिंदी रसिकांची मनं जिंकली आहेत. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये शिव ठाकरेला अश्रू अनावर झाले आणि तो रडताना दिसला. नेहमीच खंबीर राहणाऱ्या शिवला रडताना पाहून सगळेच हैराण झाले आहेत. त्यानंतर आता वीणाने शिव ठाकरेला पाठिंबा दिला आहे. शिवसाठी तिने स्टोरी शेअर केली आहे. यात तिने शिवचा बिग बॉसच्या घरातील रडताना व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टबरोबर तिने शिवसाठी खास कॅप्शनही दिले आहे. “वाघ आहेस तू…. रडू नकोस अजिबात… मी आहे सोबत नेहमी” असे तिने या पोस्टला कॅप्शन दिले आहे. याबरोबर तिने रेड हार्ट इमोजीही शेअर केले आहे. बिग बॉस मराठी २ हे पर्व शिव आणि वीणा यांच्या लव्हस्टोरीमुळे चांगलेच गाजले होते आता पुन्हा एकदा त्यांचे प्रेम फुलताना दिसत आहे.

GIF Advt

वीणाच्या या पोस्टमुळे चर्चांना उधाण आले आहे. ते दोघेही लवकरच एकत्र येणार असल्याचेही बोललं जात आहे. विशेष म्हणजे वीणाने तिच्या या पोस्टमध्ये हार्ट इमोजी शेअर करत चाहत्यांना प्रेमाचे संकेत दिले आहेत. शिवाय ती शिवला वाघ म्हणाली आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ते पुन्हा एकत्र येणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!