Latest Marathi News
Ganesh J GIF

महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीत क्रांती घडवण्यासाठी हांडेवाडीत नासाचे स्नेह संमेलन

फेसबुक पेज च्या माध्यमातून खुली बाजारपेठ निर्माण करण्याचा मानस

पुणे दि १८(प्रतिनिधी)-  कुठलेही राजकीय, शासकीय, सामाजिक संस्था किंवा कंपनीच्या पाठबळाशिवाय केवळ फेसबुक पेज च्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून चर्चेत असणारा साडेतीन हजार शेतकऱ्यांचा समूह सेंद्रिय शेती आणी तिला खुली बाजारपेठ निर्माण करून सेंद्रिय शेतीत क्रांती घडवण्यासाठी सज्ज झाला आहे.नासा या सोशियल मीडिया ग्रुप च्या माध्यमातून हांडेवाडी येथील प्रसिद्ध योगगुरू,पंचकर्मतज्ञ श्री अनंता झांबरे यांच्या आरोग्यम योगाश्रम सेंद्रिय शेती कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी नासाचे (निसर्गमित्र,आरोग्यमित्र,शेतीमित्र,आयुष्यमित्र) सेंद्रिय शेती स्नेह संमेलन पार पडले.

प्रगतशील शेतकऱ्यांनी नासाच्या मार्गदर्शनामध्ये एकत्रित येऊन सेंद्रिय शेतीचा प्रसार महाराष्ट्रभर करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांपैकी महाराष्ट्र राज्य एम एस एम ई चे टेक्निकल सल्लागार व प्रसिद्ध उद्योजक मिलिंद पाटील यांनी कृषी उद्योजकता विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.सेंद्रिय शेती धोरण व विपणन व्यवस्था समिती व रॅमिफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ प्रशांत नायकवडी यांनी शासकीय धोरण व आर्थिक सहाय्य योजनांची माहिती दिली. कॅन्सर,बीपी, शुगर झाल्यावर औषध उपचार करण्यापेक्षा रोगमुक्त व्यक्ती आणि विषमुक्त शेतीचा प्रसार महाराष्ट्रभर करण्याचा निर्धार नासाच्या संस्थापिका डॉ मानसी पाटील यांनी यावेळी केला. नांदेड,परभणी,वाशीम,धुळे,नागपूर,वर्धा, जळगाव,औरंगाबाद,अहमदनगर,सोलापूर,सातारा,सांगली,कोल्हापूर,ठाणे येथून मोठ्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांनी डॉ मानसी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शाश्वत शेती चळवळ महाराष्ट्रभर उभारण्याची साद घालुन सर्वोत्तपरी मदत करण्याची तयारी दर्शविली.या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी फोरम ऑफ इन्टलुकचेअल पुणेचे अध्यक्ष डॉ सतिष देशमुख यांचे सहकार्य लाभले

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!