Latest Marathi News
Ganesh J GIF

डीजे लावून मिरवणूक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोपट तावरे यांच्या विरोधात मोरगाव मध्ये गुन्हा दाखल”

रॅलीच्या भाषणात मतदारांना धमकी देण्याचा भयानक प्रकार

मोरगाव दि २७(प्रतिनिधी)- ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता असताना मिरवणूक काढून गावात दहशत निर्माण केली, राष्ट्रवादीचा नेता व नवनिर्वाचित सरपंचाच्या पतीसह पाच जणांविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मोरगाव येथे घडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता पोपट उर्फ कैलास सर्जेराव तावरे, निलेश हरिभाउ केदारी, अक्षय यशवंत तावरे, सुरज प्रल्हाद तावरे, समीर कैलास जाधव सर्व रा.मोरगाव ता बारामती जि पुणे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात विरोधी पॅनलचे पॅनल प्रमुख दत्तात्रय ढोले यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
पोपट सर्जेराव तावरे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असून सोमेश्वर साखर कारखान्याचा माजी संचालक आहे,
मोरगाव ग्रामपंचायत ची निवडणूक अटीतटीची झाली अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत पोपट तावरे यांच्या पत्नी अलका तावरे या सरपंच पदी निवडून आल्या तसेच त्यांचे पॅनल काही मतांनी निवडून आले पोलिसांनी निकालाच्या दिवशी मिरवणूक काढण्यास प्रतिबंध केला होता परंतु पोपट तावरे व त्यांच्या समर्थकांनी मोरगाव मध्ये जेसीबी, वाहने काढून गुलाल उधळत, डीजे लावून जोरदार मिरवणूक काढून गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

मिरवणूक नंतर झालेल्या भाषणात पोपट तावरे यांनी मला ज्या मतदारांनी घोडा लावला त्यांना देखील घोडा लावणार आहे, शासकीय अधिकाऱ्यांनी मला मदत केली, तसेच विरोधी पॅनलने पैसे वाटल्याचा आरोप देखील केला होता, नवरा सोडेन पण तात्याला सोडणार नाही अशा शब्दात महिलांचा देखील अवमान केला होता, या संदर्भात विरोधी पॅनलचे पॅनल प्रमुख दत्तात्रय ढोले यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीणचे पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली होती, स्थानिक पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ केल्याने ग्रामीण पोलीस आयुक्तांना दिलेल्या आदेशानुसार पोपट तावरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निकालाच्या दिवशी भाषणामध्ये मतदारांना धमकी देऊन मोरगाव मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले, पोपट तावरे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्यांच्यावर आजवर पाचहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत, मोरगाव सारख्या अष्टविनायक पैकी एक गणपती असलेल्या पवित्र ठिकाणी वातावरण बिघडवणाऱ्या ह्या आरोपी विरोधात कडक कारवाई करावी यासाठी गृहमंत्र्यांकडे निवेदनद्वारे मागणी करणार असल्याचे दत्तात्रय ढोले यांनी सांगितले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!