Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गटाच्या मंत्र्याची तरुणाला अश्लिल भाषेत शिवीगाळ करत मारहाण

मंत्र्याच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, सत्ताधाऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ

नागपूर दि २७(प्रतिनिधी)- आमदार मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनावरुन सत्ताधारी वादात अडकले आहेत. आता राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री दादा भुसे पोलिसांसमोरच एका युवकाला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे.

या व्हिडिओमध्ये मंत्री दादा भुसे यांच्यावर तरुणाला धमकावल्याचा आणि मारल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता विरोधकांनी शिंदे गटाच्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर आता दादा भुसे यांच्यावर आरोप केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. परंतु हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. हा व्हिडिओ. ट्विट करत आव्हाड यांनी माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलंत. माझी सीबीआय चौकशी लागावी, म्हणून सुप्रीम कोर्टात वकीलांची फौज उभी केली. माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेची आपण घेट घेतली. मुख्यमंत्रीसाहेब आपण दोघे मित्र आहोत, हे ही तुम्ही विसरलात… आता पोलिसांसमोर युवकाला फटकावणाऱ्या मंत्री भुसेंवर आपण कोणती कारवाई करणार? त्यांच्यावर कोणता गुन्हा लावणार? असे सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारले आहेत.

राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कृषी महोत्सवासाठी देणगीच्या नावाखाली पैसे आणि गायरान जमीन लाटण्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आता दादा भुसे यांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानं विरोधक विधीमंडळात सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!