अमृता फडणवीस म्हणतात ‘आज मैंने मूड बना लिया है…’
नवीन गाण्याचा टिझर पाहून नेटकरी घायाळ, तुम्ही टिझर पाहिलात का?
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी नुकतीच त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली होती. ‘अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!’ असे या गाण्याचे नाव आहे. त्याचा टिझर प्रदर्शित झाला आहे.
अमृता फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नवीन गाण्याचं पोस्टर सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं होतं. आता त्यांच्या गाण्याचं टीझर प्रदर्शित करण्यात आलं आहे. अमृता फडणवीसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये अमृता गाण्याबरोबरच डान्सही करताना दिसत आहेत. त्यांच्या नव्या व बदललेल्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा टीझर शेअर करत, ‘तुम्हाला सर्वांना या गाण्याच्या माध्यमातून भेटण्यासाठी मी फार उत्सुक आहे. उद्या माझे गाणे प्रदर्शित होत आहे. चला जल्लोष साजरा करुया’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. अमृता फडणवीस यांचं हे नवं गाणं ‘टी सीरिज’ बॅनर खाली बनवण्यात येत असून, ६ डिसेंबरला म्हणजेच उद्या प्रदर्शिक होणार आहे. या लूकमध्ये त्यांनी जीन्स, टॉप व जॅकेट परिधान केले आहे. या फोटोमध्ये त्यांनी हटके फॅशन ज्वेलरी परिधान केली आहे. त्यांच्या हा स्टायलिश लूक पाहून आता चाहते अधिकच उत्सुक झाले आहेत. तर, त्यांचा लूक पाहून नेटकरी देखील प्रतिक्रिया देत आहेत.
अमृता फडणवीस यांची अनेक गाणी गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘शिव तांडव स्रोतम’, ‘वो तेरे प्यार का गम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’, ‘कुणी म्हणाले’, ‘तेरी बन जाऊंगी’ या त्यांच्या गाण्यांना लोकप्रियता मिळाली होती.