Just another WordPress site

विवाहित प्रेयसीने प्रियकराला केले लग्नासाठी ब्लॅकमेल

पुण्यातील प्रेयसीसोबत ठाण्यातील प्रियकराचे धक्कादायक कृत्य

ठाणे दि ५(प्रतिनिधी)- लग्नासाठी तगादा लावल्याने पुण्यातल्या प्रेयसीला ठाण्यातील प्रियकराने आपल्या एका मित्राच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना टिटवाळ्यात घडली आहे. रुपांजली जाधव असं मृत महिलेचं नाव आहे. मृतदेहाशेजारी आधारकार्ड सापडल्याने या खुनाचा उलगडा झाला
पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक केली आहे.

GIF Advt

जयराज चौरे आणि सुरज घाटे अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार टिटवाळा येथील गोवेली परिसरात १२ डिसेंबर रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी तपास केला असता मृत रुपांजली जाधव विवाहित होती तिचे पुण्यात राहणाऱ्या जयराज चौरे याच्याशी प्रेमसंबंध होते. रुपांजली जयराजकडे लग्नासाठी तगादा लावत ब्लॅकमेल करत होती. त्यामुळे जयराजने रुपांजलीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्याने रुपांजलीला दागिने घेऊन देतो असे सांगत टिटवाळा येथील गोवेली परिसरात आणत मित्र सुरज घाटे याच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करत हत्या केली.

पोलीस तपासादरम्यान महिलेजवळ तिचे आधार कार्ड सापडले. या आधार कार्डच्या आधारे या मयत महिलेची ओळख पटवत टिटवाळा पोलिसांनी मयत महिलेच्या नातेवाईकांना संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कसून चौकशीला सुरुवात केली होती. अखेर टिटवाळा पोलिसांनी जयराज आणि त्याचा मित्र सुरज या दोघांना अटक केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!