![Ganesh J GIF](https://maharashtrakhabar.com/wp-content/uploads/2022/08/gif-advt.gif)
साहेब! ‘माझी बायको रुसली आहे मला सुट्टी द्या’
पोलीस हवालदाराचे सुट्टीसाठीचे पत्र व्हायरल, बघा का रूसलीय बायको
लखनऊ दि १०(प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशमधील एका पोलीसांसमोर सुट्टीसाठी केलेला अर्ज सध्या जोरदार चर्चेत आहे त्यात सुट्टीसाठी सांगितलेले कारण सध्या जोरदार व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या कारणानंतर त्याची सुट्टी तातडीने मंजुर करण्यात आली आहे.पण सध्या पोलीस हवालदाराचं पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यूपीतील महाराजगंज जिल्ह्यातील नौतनवान पोलीस स्टेशन परिसरातील पीआरव्हीमध्ये तैनात असलेला एक कॉन्स्टेबल गौरव चौधरी यांनी अर्ज करत सुट्टी मागितली. सध्या ते भारत नेपाळ सीमेवर कार्यरत आहेत. त्यांचे गेल्या महिन्यात लग्न झाले आहे. त्यानंतर ते पत्नीला घरी सोडून ते ड्युटीवर हजर झाले. पण नंतर पत्नी फोन उचलत नसल्यामुळे त्यांनी सुट्टीसाठी अर्ज केला त्या त्यांनी लिहिले आहे की, महिन्याभरापूर्वी माझ लग्न झालंय. लग्नानंतर लगेच मी बायकोला सोडून ड्यूटीवर परतलो. मी बायकोला वचन दिलेलं की मी लवकर सुट्टी घेऊन घरी येईन. पण, आता त्याला सुट्टी मिळत नाहीये. सुट्टी मिळत नसल्याने बायको नाराज झाली आहे. ती माझ्याशी नीट बोलत नाहीये, मी वारंवार कॉल करतोय पण ती फोन उचलत नाही आणि फोन उचलला की काहीही न बोलता थेट आईला देते. मी तिला वचन दिलं होतं की भाच्याच्या वाढदिवसाला घरी येईल. त्यामुळे कृपया मला १० जावेनारीपासून सात दिवसांची सुट्टी देण्यात यावी. मी आपला आभारी राहिल’, असं त्यांनी पत्रात लिहिले आहे. अशा अफलातून मजकुरामुळे ते पत्र जोरदार व्हायरल होत आहे.
या पत्रानंतर त्यांना पाच दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.या बाबत पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ड्यूटीवर असलेल्या पोलिसांना त्यांच्या गरजेनुसार सुट्ट्या दिल्या जातात या पोलिसालाही त्याच्या अर्जाच्या आधारावर पाच दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. आता गाैरव पत्नीला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी घरी पोहोचले आहेत.