श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ही अभिनेत्री रूग्णालयात दाखल
अचानक खाली कोसळल्याने दुखापत,इतके दिवस होती व्हेंटिलेटरवर
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- बाॅलिवूड अभिनेत्री महक चहलला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मागील चार दिवसांपासून महक मुंबईच्या एका रुग्णालयात भरती असून, तिला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
महक २ जानेवारीला काम करत असताना अचानक खाली पडली आणि तेव्हा तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात दाखल होताच तिच्या सर्व टेस्ट करण्यात आल्या त्यानंतर तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मागील ८ दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरु आहेत.चहलने तिच्या तब्येतीबद्दल सांगितले की, “मला निमोनिया झाला होता, त्यामुळे मी मागील तीन चार दिवसांपासून आयसीयूमध्ये होते. मला ऑक्सिजन व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले होते.आता मी जनरल वॉर्डमध्ये असून माझ्या तब्येतीमध्ये खूपच सुधार होत आहे. मात्र अजूनही मला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे तिने सांगितले आहे. त्याचबरोबर “मी माझ्या आयुष्यात कधीच त्या पॉइंटवर पोहचली नाही, जिथे मी श्वास घेऊ शकत नाही. असा थरारक अनुभव देखील तिने सांगितला आहे.
महकने २००३ मध्ये ‘नयी पडोसन’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. तसेच ती सलमान खानच्या रियालिटी शो बिग बॉसमध्येही झळकली आहे. ती बिग बॉसच्या पाचव्या पर्वात दिसली होती. यासोबतच ती अनेक बॉलिवूड आणि मालिकांमध्ये झळकली आहे.