Latest Marathi News
Ganesh J GIF

मुंबईत धावत्या कारमधून तरुण काढत होता तरुणींची छेड

तरुणाचा तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल, मुंबई पोलीसांकडुन 'हे' उत्तर

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- मुंबईतील मानखुर्द येथे असलेल्या उड्डाण पुलावर एका मुलाचा जीवघेणा स्टंट कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुलींना पाहून त्यांची छेड काढत हा मुलगा धावत्या कारच्या बाहेर येऊन मुलींना बोलवत होता. तेव्हा हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तसेच सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

ओला कॅबमधून एक मुलगा जीवघेणा स्टंट करत होता. तो आपल्या कारमध्ये बसण्यासाठी मुलींना बोलवतो होता. ही घटना मानखुर्द उड्डाणी पुलावरती घडली आहे. ज्या मुलीला हा मुलगा कारमध्ये बसण्यासाठी बोलवत होता. त्याच मुलीने हा व्हिडिओ शूट केला आहे. अशा प्रकारे स्टंट करणं हे या मुलाच्या जीवावर बेतू शकले असते. त्याचबरोबर मुलींची छेड काढत असल्यामुळे सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.सामाजिक कार्यकर्ते राज माजी यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज मागावावे आणि या तरुणावर कठोर कारवाई करावी अशी मागणी राज माजी यांनी केली आहे. दरम्यान मुंबईतल्या मानखुर्द भागात घडलेला स्टंटचा हा प्रकार त्या तरूणाच्या जीवावरही बेतला असता. धावत्या कारमधून तो बाहेर येत असल्याने तो पडला असता तर त्याचा अपघात झाला असता. सध्या व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

राज माजी यांनी आपल्या ट्वीट मुंबई पोलिसांनाही टॅग केले होते. हा व्हिडिओ ट्वीट केल्यानंतर राज माजी यांना काही वेळातच मुंबई पोलिसांनीही उत्तर दिले आहे. “आम्ही तुमची विनंती मानखुर्दच्या वाहतूक विभागाकडे पाठवली आहे. ते काही वेळातच आवश्यक ती कारवाई करतील,” असे उत्तर मुंबई पोलिसांनी दिलं आहे. आता कारवाई होणार का हे पहावे लागेल.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!