जेवणाची भांडी न धुतल्यामुळे शिक्षिकेची विद्यार्थ्यांला बेदम मारहाण
गळा दाबत मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल, कारवाईची मागणी
पाैडी दि १३(प्रतिनिधी)- सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक महिला शिक्षिकेने विद्यार्थ्याचा गळा दाबत बेदम मारहाण केली आहे.हा व्हिडीओ उत्तराखंड राज्यातील पौड़ी जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड राज्यातील पौडी जिल्ह्यात गुरुराम राय इंटर कॉलेजमध्ये एनएसएसचं शिबीर लागलं आहे. तिथे जेवून झाल्यानंतर भांडी न धुतल्यामुळे संतापलेल्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारहाण केली आहे. यावेळी त्या शिक्षिकेने गळा सुद्धा दाबला होता.अमानुष मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला आहे.हा सगळा प्रकार शिक्षण अधिकारी यांच्याकडे गेला आहे. त्यामुळे शिक्षिकेवरती कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान शिक्षिकेच्या या मारहाणीमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेक लोकांच्या कमेंट आल्या आहेत. त्याचबरोबर महिला शिक्षिकेला शिक्षा करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. आता शिक्षण अधिकारी काय कारवाई करणार हे पहावे लागेल.