Latest Marathi News
Ganesh J GIF

हडपसरमधील कोयता गँगच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

समीर पठाण याच्यासह १३ जणांवर मोठी कारवाई, दहा जणांना ठोकल्या बेड्या

पुणे दि १३(प्रतिनिधी)- हडपसर परिसरातील सार्वजनिक रोडवर समिर लियाकत पठाण आणि त्याच्या साथीदारांनी नागरीकांना शिवीगाळ करुन दगड, बेल्टने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. पठाण आणि त्याच्या टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पुणे परिसरातील मांजरी बुद्रुक, भेकराईनगर, गंगानगर, मुंढवा रस्ता, हडपसर भागात कोयता गँगच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्या दहशतीचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. हे कोयता गँगचे लोण इतर शहरातही वाढत होते. मांजरी बुद्रुक या ठिकाणी ८ ते १० मुलांनी ९ डिसेंबरलस नागरिकांना दगडाने, बेल्टने मारहाण करुन जखमी केले होते. जाताना गाडीला लावलेले कोयते हवेत फिरवत नागरिकांना ‘आम्ही इथले भाई आहे,’ तुम्हाला परत येवून बघतो, असे म्हणून दहशत निर्माण केल्याची तक्रार दिल्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी संघटीतपणे गुन्हा करीत असल्याचे दिसून आल्यामुळे त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीसांनी टोळी प्रमुख समिर लियाकत पठाण, शोएब लियाकत पठाण, गणेश उर्फ दादा विठ्ठल हवालदार, प्रतिक उर्फ एस.के. हनुमंत कांबळे, गितेश दशरथ सोलनकर, ऋतिक संतोष जाधव, साई राजेंद्र कांबळे, ऋषिकेश उर्फ सोन्या संजय पखाले, ऋतिक सुनील मांढरे, प्रतिक शिवकुमार सलगर यांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर इतर तीन साथीदार फरार आहेत.

पुण्यातील अनेक भागात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला होता.गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयता हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी विशेष पथक स्थापन केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!