
काश्मिरमध्ये लष्कराच्या एका जवानाने सहकाऱ्यांवरच केला गोळीबार, बघा नेमक तिथ काय घडल…? बघा सविस्तर बातमी
श्रीनगर प्रतिनिधी – लष्कराच्या एका जवानाने ()आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना जम्मू-काश्मिरात घडली आहे. या गोळीबारात एक जवान जागीच ठार झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. ज्या जवानाने हा गोळीबार केला, तो जवानही या गोळीबारात जखमी झाल्याची माहिती आहे. पुंछ भागात असलेल्या सुरनकोट येथील लष्कराच्या छावणीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश सैन्याकडून देण्यात आल्याची माहिती आहे. लष्करी जवानांकडूनच आपल्या सहकाऱ्यांवर होत असलेल्या गोळीबारांच्या घटनांत गेल्या काही महिन्यांत वाढ झालेली आहे.
तीन आठवड्यांपूर्वी पंजाबातही झाला होता असाच प्रकार
पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यातील मीरथल कँन्टोन्टमेंटमध्ये एका जवानाने झोपलेल्या दोन सहकाऱ्यांवर गोळीबार केला होता. या अंदाधुंद गोळीबारात दोन जवान जागीच ठार झाले होते. यानंतर झालेल्या गोँधळाचा फायदा घेत हा आरोपी जवान पसारही झाला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सैन्यदलाने सर्च ऑपरेशन करुन या गोळीबार करणाऱ्या जवानाला अटक केली आहे. हवालहार गौरीशंकर आणि सूर्यकांत या दोघांचा या घटनेत नाहक बळी गेला. आरोपी जवान लोकेश याला अटक करण्यात आली असून, पुढील लष्करी कारवाई सुरु आहे.