
पिंपरी चिंचवड – शहरातील हिंजवडी परिसरामध्ये एक अतिशय अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंडक कापलेल्या आज्ञात व्यक्तीच मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आला आहे. आज संध्याकाळी हिंजवडी – महाळुंगे रोड वर रस्त्याच्या कडेला एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका अज्ञात व्यक्तीचं मुंडक कापलेलं मृतदेह आढळून आला आहे.
या घटनेमुळे हिंजवडी आय टी पार्क परिसरात मोठी खळबळ उडाली असून, हिंजवडी पोलीसानी घटना स्थळी दाखल होऊन, मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठविला आहे. तसेच या अज्ञात व्यक्तीच्या खुनास कारणीभूत ठरणाऱ्या अज्ञात मारेकऱ्या विरोधात हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खून कोणी केला का केला हा व्यक्ती कोण यांचा तपास आता हिंजवडी पोलीस करत आहेत नेहमी गजबजलेल्या आयटी पार्क मध्ये हा धड नसलेला मृतदेह आढळल्याने संपूर्ण पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे