Just another WordPress site

अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती,आरोपी तरुणाला शिक्षा काय ? ही बातमी बघा…!

जळगाव विशेष प्रतिनिधी : चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावास आणि 30 हजार रूपये दंडांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जळगाव जिल्हा न्यायालयाने न्यायमूर्ती बी. एस. महाजन यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.

GIF Advt

रविंद्र उर्फ रितेश बापू निकुंभ राहणार डेराबर्डी तालुका चाळीसगाव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहेचाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच तरुणाने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला होता. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात रविंद्र उर्फ रितेश बापु निकुंभ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर रविंद्र निकुंभ याला अटक केली होती.

     या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा न्यायालयातील न्यायमूर्ती बी.एस. महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. या खटल्यात एकूण 12 साक्षिदार तपासण्यात आले. खटला सुरू असताना अल्पवयीन मुलगी सज्ञान झाल्याने तिचा विवाह झाला होता. विवाहानंतर तिचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे तिची साक्ष नोंदवण्यात आलेली नव्हती. त्यामुळे यात यात पिडीतेचे वडील, वैद्यकीय अधिकारी आणि इतर साक्षिदारांची साक्ष महत्वपूर्ण ठरल्या.साक्ष-पुराव्याअंती रविंद्र उर्फ रितेश बापू निकुंभ याला दोषी ठरवत विविध कलमान्वये 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि 30 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. चारुलता बोरसे यांनी काम पाहिले. तर, केसवॉच म्हणून दिलीप सत्रे यांनी सहकार्य केले.
आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!