
जळगाव विशेष प्रतिनिधी : चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावास आणि 30 हजार रूपये दंडांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जळगाव जिल्हा न्यायालयाने न्यायमूर्ती बी. एस. महाजन यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.
रविंद्र उर्फ रितेश बापू निकुंभ राहणार डेराबर्डी तालुका चाळीसगाव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहेचाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच तरुणाने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला होता. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात रविंद्र उर्फ रितेश बापु निकुंभ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर रविंद्र निकुंभ याला अटक केली होती.