अष्टापूर ग्रामपंचायतच्या वतीने पत्रकारांचा सन्मान
जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात सादर, शिवसृष्टीची पाहणी
अष्टापूर ( ता. हवेली ) येथील पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी पर्यंतच्या वर्गातील मुलांचे स्नेह संमेलन साजरे करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रिंट व डिजिटल मिडियाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुनील जगताप यांनी सांगितले की अष्टापुर येथील जिल्हा परिषदेच्या शाळे मध्ये पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचे शिक्षण व संस्कार शाळेतून दिले जात असुन शाळेय स्पर्धेत भाग घेणाऱ्या विदयार्थांना बक्षिसांची लयलूट केली जाते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या कल्पना जगताप, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप, ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी कोतवाल, उपसरपंच सोमनाथ कोतवाल, माजी सरपंच नितीन मेमाणे, ग्रामपंचायत सदस्य संजय कोतवाल, सुभाष कोतवाल, अलका कोतवाल, रेश्मा ढवळे, माजी उपसरपंच शामराव कोतवाल, श्रीहरी कोतवाल, शाळा व्यवस्थापन समितीचे किरण कोतवाल, रमेश कोतवाल, दीपक कोतवाल, कल्पना कोतवाल, उर्मिला कोतवाल, शीतल कोतवाल, महेश कोतवाल, राहुल कोतवाल, नितीन कोतवाल, आण्णा कोतवाल, निता भालेराव, तयाजी जगताप, शिवाजी कोतवाल, विक्रम कोतवाल, शिक्षक तुकाराम कांबळे, मंगल खांदवे, राजेंद्र कदम व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
यावेळी प्राथमिक शाळेत तयार करण्यात आलेली शिवसृष्टी दाखविण्यात आली. अष्टापूर सारख्या छोट्या गावात तेथील गावक-यांनी आपल्या गावातील लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती मिळावी म्हणून हा शिवसृष्टीचा उपक्रम राबविला आहे. एका वर्गखोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना चित्ररुपाने रंगवून घेतल्या आहेत. या अनोख्या उपक्रमाबद्दल अष्टापूर ग्रामपंचायतीचे ग्रामस्थांचे व स्थानिक शिक्षण समितीचे राज्य भरातुन कौतुक होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत विविध प्रयोग राबविणारी पुणे जिल्ह्यातील व बहुधा राज्यातील एक उत्कृष्ट शाळा असल्याचे पंचक्रोशीतील नागरिक म्हणत आहेत.