Latest Marathi News

या अभिनेत्रीच्या बोटात डायमंड रिंग दिसल्याने चर्चांना उधान

डायमंड रिंगवर खुलासा करताना म्हणाली मी रिलेशनशिपमध्ये....

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- पंजाबची कॅटरिना कैफ अशी ओळख असलेली अभिनेत्री शहनाज गिल सध्या आपला चॅट शो ‘देसी वाइब्स विथ शहनाज गिल’ मुळे चांगलीच चर्चेत असते. नुकतेच शहनाज आणि गुरु रंधावा यांचे ‘मून राइज’ हे नवीन गाणे रिलीज झाले आहे, जे चाहत्यांना खूप आवडत आहे. शहनाज गिलने सांगितले की तिने स्वतःला डायमंड रिंग भेट दिली आहे.


देसी वाइब्समध्ये रकुल प्रीत तिच्या ‘छत्रीवाली’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. यादरम्यान तिला शहनाज गिलच्या हातात हिऱ्याची अंगठी दिसली. त्यामुळे तिने या अंगठीबद्दल विचारले असता, शहनाज गिलने सांगितले की तिने स्वतःसाठी हिऱ्याची अंगठी का घेतली आहे. अभिनेत्रीने सांगितले की, “कारण अंगठी कोणीही मला देऊ नये म्हणून खरेदी केली आहे.” शहनाजनंतर रकुलने असेही सांगितले की, ३ वर्षांपूर्वी तिने स्वत:साठी हिऱ्याची अंगठीही खरेदी केली होती. त्याचबरोबर आपण रिलेशनमध्ये नसल्याचा खुलासा तिने केला आहे.


शहजान गिल लवकरच सलमान खानसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तिचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २१ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. बिग बाॅसमुळे शहनाज चर्चेत आली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!