
एका सहा वर्षांच्या चिमुरुडीचा मृत्यू चॉकलेट घशात अडकल्याने झाला आहे. ही वेदनादायी घटना कर्नाटकातील उडपी जिल्ह्यात घडली आहे. ही मुलगी स्कूल बसमध्ये चढत असतानाच नेमका हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चिमुरडी शाळेत जाण्यास तयार नव्हती. शाळेत जाण्यासाठी तिच्या आई-वडील आणि घरातील इतरांनी तिला कसेबसे तयार केले. तिच्या आईने या लहानगीची समजूत काढण्यासाठी तिला एक चॉकलेटही दिले. याच काळात स्कूल व्हॅन घराच्या बाहेर येऊन उभी राहिली. ती व्हॅन पाहून या लहानगीने रॉपरसह चॉकलेट तोंडात टाकले. चॉकलेट रॅपटरसह तोंडा टाकल्याने तिचा श्वास कोंडला गेला, स्कूल व्हॅनच्या दरवाजातच ती बेशुद्धावस्थेत पडली. सुरुवातीला नेमकं काय झालं हे कुणालाच कळेना. नंतर तिला श्वास घेता येत नसल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले. स्कूल व्हॅनचा ड्रायव्हरही या काळात तिच्या मदतीसाठी खाली उतरुन पुढे धावला. तिच्या घरातील कुटुंबीयही घरातून धावत बाहेर आले. तिच्या हातातले चॉकलेट दिसत नव्हते, त्यावरुन ते चॉकलेट तिने घाईघाईत रॅपरसह गिळल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले.
हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच तिचा झाला मृत्यू