Latest Marathi News

पैसे परत देण्यास नकार दिल्याने तरुणाला मारहाण, हडपसर पोलिस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल..! बघा नेमक प्रकरण काय…?

हडपसर प्रतिनिधी – शेअर मार्केटमध्ये गुंतविलेले पैसे परत देण्याची मागणी करुन ते न दिल्याने चौघांनी तरुणाला कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण करुन हाताची नखे उपटून  काढण्याची धमकी (Threat) देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अभिषेक विजय पवार वय 22, रा. अंजना अपार्टमेंट, भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सागर हेगडे  (रा. फुरसुंगी), मयुर पडवळ (रा. चाकण), पंकज पांचाळ  (रा. भेकराईनगर) आणि अमित अवचरे (रा. तुकाईदर्शन) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार भेकराईनगर येथील आयबीएम कंपनीजवळ, तसेच तुकाईदर्शन येथे घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक पवार याच्याकडे काही लोकांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी पैसे दिले होते़. पण तो ते परत करत नव्हता. 19 जुलै रोजी रात्री दहा वाजता तो व त्याचा मित्र वैष्णव पाडुळे हे चालत घरी जात असताना भेकराईनगर  येथे चौघांनी त्यांना अडविले. त्याचे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केलेले पैसे आताच्या आता परत दे, अशी मागणी करुन फिर्यादी याला हाताने मारहाण केली. त्यानंतर 20 जुलै रोजी मध्यरात्री फिर्यादी हे घरी असताना आरोपींनी त्याला घराबाहेर बोलविले. आमचे पैसे आता परत दे असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शॉपमधील फायबर वायर व पँटच्या कमेरचा पट्टा याने फिर्यादीच्या पाठीवर व हातावर मारहाण करुन जखमी केले. सागर हेगडे याने तु जवळचा आहे, म्हणून तुला सोडतो. तु आमचे पेसे लवकर परत दे, नाही तर तुझे हाताची नखे उपटून काढली असती, अशी धमकी दिली. पोलीस नाईक भोसले  तपास करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!