नवरदेवाची वरात दारात आली अन् अचानक झाला नोटांचा पाऊस
सोशल मिडीयावर व्हिडीओ जोरदार व्हायरल, पाहुणे मंडळींची अशी झाली अवस्था
मेहसाणा दि १९(प्रतिनिधी)- आपला भारत विविधतेचा देश आहे. त्यामुळे भारतात सर्वच ठिकाणी लग्नाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. अशीच एक पद्धत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ती पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.
नवरदेव किंवा नवरीच्या अंगावर ओवाळून १०, २०, ५० जास्तीत जास्त १०० ची नोट ओवाळून टाकली जाते. पण एका लग्न सोहळ्यादरम्यान ज्या घरात लग्न आहे त्या घरातील लोक घराच्या गच्चीवरुन लाखो रुपयांच्या नोटांची उधळण केली आहे. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. गुजरातमधील केकरी तालुक्यातील सेवडा अगोल गावातील ही घटना आहे. या गावात माजी सरपंच असलेल्या एका व्यक्तीच्या भाच्याचे लग्न होते.नवरदेवाची वरात खाली आली असता सरपंचाच्या घरातील लोक बाल्कनी आणि गच्चीवरुन 10 रुपये आणि 500 रुपयांच्या नोटा उधळताना दिसले. वरुन नोटांची उधळन सुरु असताना घराखाली काही लोक या नोटा गोळा करतानाही दिसून आले आहेत. सोशल मिडीयावर नोटा झेलण्याच्या या पद्धतीवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.
#SorosGang भिखारी ए भारत हे तेरे वाहा filmo मे रुपीया उडते हे 🤣🤣🤣
गुजरात मेहसाणा pic.twitter.com/T7lKnK8AnA— akshaypatel (@akshayhspatel) February 18, 2023
गुजरातमध्ये अशाप्रकारे नोटा उधळण्याची पद्धत फार जुनी आहे. अनेक शुभ कार्यक्रमांमध्ये, गाण्यांच्या कार्यक्रमांमध्ये अशाप्रकारे नोटा उधळल्या जातात. त्याचे व्हिडीओही त्या त्या वेळी सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात.