अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात ‘या’ कारणांमुळे भाजपा जिंकली
चिंचवडचा गड आश्विनी जगतापांनी राखला, राष्ट्रवादीला 'ना'ना', हे मुद्दे ठरले निर्णायक
चिंचवड दि ३(प्रतिनिधी)- आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चिंचवडमध्ये नुकतीच पोटनिवडणूक पार पडली. यात भाजपाचे उमेदवार आश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीच्या काटे यांचा पराभव केला. पण या निवडणूकीत अनेक मुद्दे निर्णायक ठरले आहेत.
चिंचवडमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीचे बडे नेते प्रचारासाठी उतरलेले बघायला मिळाले.अगदी मध्यरात्री सुद्धा नेते मंडळी गाठीभेटी घेत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगवीतील सभेत त्यांनी शास्ती कर माफ करण्याचा निर्णय घेणार असल्याची घोषणा टर्निंग पाईंट ठरली. त्याचबरोबर सोसायटीधारकांचे प्रश्न, स्थानिक मुद्दयांना भाजपने हात घातल्याने भाजपचा विजय सोपा झाला कारण राष्ट्रवादी ज्या पद्धतीने प्रचार करत होती. ते पाहून ही लढत चुरशीची होईल असे दिसत होते. पण भाजपाने स्थानिक मुद्दयांना प्राधान्य देत वातावरण फिरवले. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आमदार महेश लांडगे यांचे प्लॅनिंग भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांची संपूर्ण सोशल मीडिया टीम आणि बॅक ऑफिस टीम निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. शिवाय प्रत्येक नगतसेवकांवर जबाबदारी देण्यात आली होती. आणि लांडगेंचा शहरात होल्ड असल्याने नगरसेवकांनी जबाबदारी काम केले. महत्वाचे म्हणजे चिंचवड पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांनी केलेली बंडखोरी भाजपच्या पथ्थ्यावर पडली. राहुल कलाटे यांनी चिंचवडमध्ये ४४ हजारांपेक्षा जास्तच मताधिक्य घेतले, ज्याचा फटका महाविकासआघाडीला बसला. कलाटेंचे डिपाॅझीट जप्त झाले असले तरीही कलाटेंमुळे महाविकास आघाडीतील मतांची विभागणी झाली ती भाजपाच्या फायद्याची ठरली. चिंचवडमध्ये महाविकासआघाडीने सुरूवातीच्या टप्प्यात प्रचारात आघाडी घेतली, पण शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा वेग कायम ठेवण्यात त्यांना अपयश आले. त्याचबरोबर नाना काटे यांना त्यांचे वर्चस्व असलेल्या भागातून अपेक्षित लीड घेता आला नाही त्यामुळे नाना काटे यांच्या अडचणी वाढल्या आणि आश्विनी जगताप यांनी पोट निवडणूकीत बाजी मारली.
पुण्याच्या हुजूरपागा शाळेत दहावीचे शिक्षण घेतलेल्या अश्विनी निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या कन्या आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या पिंपळे गुरवच्या सूनबाई झाल्या.पतीचे राहिलेले विकासकामांचे अर्धवट स्वप्न पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करीन हे भावनिक आवाहन मतदारांवर परिणाम करणारे ठरले त्यामुळे आश्विन जगताप विजयी होऊन आमदार झाल्या.