भाराताचा ऑस्ट्रेलियाविरोधात पराभव आणि नकोसा विक्रम नावावर
भारताचे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील स्थान डळमळीत, बघा समीकरण
इंदाैर दि ३(प्रतिनिधी)- इंदोर कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने गुरुवारी ९ विकेटने भारताला पराभूत केले. ७६ धावांचे लक्ष ऑस्ट्रेलियाने सहज पार केले. . या विजयासह, कांगारू संघाने चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी बरोबरी साधली. पण या पराभवामुळे भारताचा मार्ग खडतर झाला आहे.
भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवायचे असेल तर या मालिकेत ऑस्ट्रेलियाला कोणत्याही परिस्थितीत ३-१ ने पराभूत करावे लागेल. त्यामुळे भारताला आता अहमदाबाद मधील कसोटी सामना जिंकावाच लागेल. पण या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचे कसोटी चॅम्पियनशिपमधील स्थान पक्के केले आहे. जर ऑस्ट्रेलियाने मालिका २-१ ने गमावली किंवा २-२ अशी बरोबरीत सोडली, तर भारताला फायनल खेळण्यासाठी श्रीलंका आणि न्यूझीलंड मालिकेवर अवलंबून राहावे लागेल. कारण गुणतालिकेत श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत श्रीलंका न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत २-० ने पराभूत झाल्यास भारताचा मार्ग सुकर होईल.अवघ्या अडीच दिवसात संपलेल्या सामन्यामुळे भारताचा कसोटी जेतेपदाचा मार्ग अवघड तर झाला आहेच, पण या पराभवामुळे भारताच्या नावे लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. पण एकंदरीत समीकरणे पाहिल्यास डब्ल्यूटीसी फायनल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातच होईल, असे दिसत आहे.
भारताने मायदेशातील ४३ कसोटी सामने खेळले आणि त्यापैकी फक्त ३४ सामने संघाने जिंकले आहेत. तर ६ सामने अनिर्णित राहिले असून अवघ्या तीन सामन्यात भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. मागच्या १० वर्षात भारताला भारतातील कसोटी सामन्यात पराभूत करणारे संघ २०१७ विरुद्ध ऑस्ट्रेलिया (पुणे), २०२१ विरुद्ध इंग्लंड (चेन्नई), २०२३ विरुद्ध ऑस्ट्रेलिया (इंदोर) त्यामुळे लाजीरवाणा विक्रम नोंदवण्यात आला आहे.