शिंदे गटाचे शीतल म्हात्रे- प्रकाश सुर्वे यांचा ‘तो’ मॉर्फ व्हिडिओ व्हायरल
दहिसर पोलीसात तक्रार दाखल, व्हायरल व्हिडिओवरुन शिंदे गट व ठाकरे गटात जुंपली
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील दोन गटातील संघर्ष अजूनही सुरूच आहे. पण आता ही लढाईचा स्तर खालावत असल्याचे दिसत आहे.शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते. या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर करून व्हायरल करण्यात आला आहे. शीतल म्हात्रे यांनी आपला व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. तसेच दहिसर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. शीतल म्हात्रे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या, “राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत? मातोश्री नावाच्या फेसबूक पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा मॉर्फ व्हिडीओ अपलोड करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?” असा सवाल उपस्थित केला आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहेत.
काहीही म्हणा पण शिवसेनेने तळागाळातील लोकांना आमदार खासदार केले हा प्रकाश सुर्वे भाजी विकायचा कांदिवली मध्ये आज बऱ्याच दिवसानंतर गाणं ऐकलं पप्पी दे पप्पी दे
शिंदे च्या बाजूला थांबून प्रकाश सुर्वे पप्प्या घेत सुटलाय शिंदे ना माहितीच नाही #शीतल_म्हात्रे #प्रकाश_सुर्वे #पप्पी pic.twitter.com/1ZIsVwQWYi— Rahul Ostwal (@rahulostwal) March 12, 2023
व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना अद्दल घडवावी अशी मागणी शिवसैनिकांनी करत पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. व्हिडीओ पोस्ट करणारे बरेचजण युवासेनेचे कार्यकर्ते आहेत,” असा आरोप शीतल म्हात्रेंनी केला आहे. यावरून शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.
राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत?? मातोश्री नावाच्या fb पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा morphed video upload करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले? pic.twitter.com/rpaqbMtiZU
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) March 11, 2023