Just another WordPress site

या अभिनेत्रीने तीन वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न

वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळे खचली होती अभिनेत्री, आज आहे सुपरस्टार

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- प्रियांका चोप्राला बॉलिवूडमध्ये देसी गर्ल म्हणूनही ओळखले जाते. आज प्रियांकाने तिच्या मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली आहे.पती निकसोबत ती सध्या अमेरिकेत राहत आहे.


पण आता प्रियंका चोप्राच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा करण्यात आला आहे. प्रियंका चोप्रा तिच्या आयुष्यात इतकी निराश झाली होती की तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. प्रियांकाचे माजी व्यवस्थापक प्रकाश जाजू यांनी हा दावा केला आहे. जाजू म्हणाले “आज खूप स्ट्रॉन्ग दिसत असलेल्या प्रियंकाने यापूर्वी २-३ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि मी तिला कसेतरी थांबवले होते.प्रियंका आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड असीम मर्चंटमध्ये खूप भांडण व्हायचे. त्यादरम्यान मध्यरात्री त्रासलेल्या अवस्थेत प्रियंका मला अनेकदा फोन करायची.एकदा असीमसोबत भांडण झाल्यावर प्रियंका मुंबईच्या वसई भागात ड्राईव्हसाठी आली आणि तिथे तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर त्यानंतर २००२ साली असीमच्या आईचे निधन झाल्यानंतर प्रियांकाला वसईतील इमारतीवरून उडी मारून जीवन संपवायचे होते. त्यावेळी तिला बांधून ठेवण्यात आले होते. असे जाजू म्हणाले आहेत. याच प्रकाश बरोबर वाद झाल्याने प्रियंकाने प्रकाशसोबतचा करार तोडला होता. याप्रकरणी प्रकाशवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता.

GIF Advt


प्रियांका सध्या लंडनमध्ये असून तिनं पॉप सिंगर निक जोनसबरोबर लग्न केलं. दोघांना मालती नावाची मुलगी देखील आहे. प्रियांका लवकरच हॉलिवूड सिनेमात रिड रोल करताना दिसणार आहे. नुकताच तीची मुख्य भूमिका असलेला सिटाडेलचा ट्रेलर सोमवारी लाँच करण्यात आला होता. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!