Latest Marathi News
Ganesh J GIF

हडपसरमधील अंडा अपघातामुळे वाहनाचालकांना स्लीपचा फटका

विचित्र अपघाताचा व्हिडिओ समोर, अपघाताने रस्ता चिकट, बघ्यांमुळे ट्राफिक जाम

पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुण्यात आज पहाटे विचित्र अपघात घडला. त्यामुळे अनेक वाहनचालकांनाही त्याचा फटका बसला. हडपसर भागातल्या सुरूची हॉटेलसमोरच्या उड्डाण पुलावर अंड्याचा टेम्पो पलटी झाला.त्यामुळे अनेक गाड्या स्लीप झाल्या. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

हडपसर सुरुची हॉटेल समोर उड्डाण ब्रिजवरती अंड्याचा टेम्पो पलटी झाल्यामुळे पुलावरच अनेक अंडी फुटली. पुलावरती अंडी फुटल्यामुळे अंड्याच्या बलकामुळे आजूबाजूचा रस्ता चिकट झाला होता, त्यामुळे टू व्हीलर आणि फोर व्हिलरवरून जाणारे अनेक जण स्लीप होत होते. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या अंडाफुटीने मात्र वाहनचालकांची चांगलीच त्रेथातिरपीट उडवली. अग्निशमन दलाने रस्त्यावर पाणी टाकून रस्ता साफ केला. तसंच पलटी झालेला टेम्पो जेसीबीच्या साहाय्याने बाजूला हटवण्यात आला. पण हा विचित्र अपघात बघण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. सुदैवाने गाडी स्लीम होऊन कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अलिकडच्या काळात सातत्याने अपघात होत आहेत. या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर अनेक खाजगी बस महामार्गावरच बस थांबवत प्रवासी भरत असल्यामुळे रस्ता अरुंद होऊन अपघात घडत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!