आषाढी पालखी सोहळ्यासाठी जमणार वारकऱ्यांचा मेळा
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर
पुणे दि ९(प्रतिनिधी) – संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्याकडून ३३८ व्या पालखी सोहळ्याचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा यंदा १० जून रोजी होणार आहे, आणि २९ जूनला पंढरीत दाखल होणार आहे तर दुसरीकडे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आषाढीवारी सोहळा ११ जुनला आळंदीतुन पालखी प्रस्थान ठेवणार असुन २९ जुनला पंढरीत दाखल होणार आहे. अशी माहिती व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली आहे. यावर्षी २८ जूनला देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशी आहे.
राज्यभरातील पांडुरंगाचे निस्सीम भक्त वारकरी ज्या वेळेची वाट पाहत असतात ती वेळ आता जवळ येत आहे. आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे. पण सध्या कोरानाची वाढती संख्या पाहता तत्कालीन परिस्थिती पाहुन निर्णय घेतला जाणार आहे. शेतीच्या मशागतीची कामे अटपुन कष्टकरी बळीराजा माऊलींच्या सोबतीने पंढरीकडे प्रस्थान ठेवणा-या सोहळ्यात सहभागी होत असतो.
तुकाराम महाराज पालखी कार्यक्रम
१० जुन-देहुतून पालखी प्रस्थान
११ जुन- आकुर्डी मुक्काम
१३ जुन- पुणे श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम
१३ जून- पुणे दर्शनासाठी मुक्काम
१४ जून – लोणीकाळभोर
१५ जून – यवत
१६ जून- वरवंड
१७ जून – उंडवडी गवळ्याची
१८ जून- जुन बारामती
१९ जून – सणसर
२० जून – आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण
२१ जून – निमगाव केतकी,
२२ जून – इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण
२३ जून- सराटी
२४ जून – सकाळी निरा स्नान व दुपारी तिसरे गोल रिंगण अकलुज
२५ जून- सकाळी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण, बोरगाव मुक्काम
२६ जून- सकाळी धावा व पिराची कुरोली मुक्काम
२७ जून – बाजीराव विहिर येथे रिंगण व मुक्काम
२८ जून- पंढरपुरात दाखल.
२९ जून – श्री संत तुकाराम महाराज संस्थान (मंदिर) येथे मुक्काम
तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे ३३८वे आहे. १० जूनला प्रस्थान झाल्यानंतर दरमजल करत सोहळा ३८ जूनला पंढरपूरात पोहोचणार आहे. एकूण १९ दिवसांचा हा प्रवास असेल. पालखी २९जून २०२३ ते ३ जुलै २०२३ या कालावधीत पंढरपूर येथे मुक्कामी राहील. त्यानंतर पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी दिली आहे.