Latest Marathi News
Ganesh J GIF

‘लोभी व्यक्ती’ म्हणत शरद पवारांवर काँग्रेस नेत्याची जहरी टिका

महाविकास आघाडीत बिघाडी, पवारांच्या भूमिकेला भाजपाची साथ

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याबद्दल स्पष्ट भूमिका घेऊन काँग्रेसची आणि राहुल गांधी यांची कोंडी केली आहे. त्यामुळे काँग्रेसने शरद पवार यांच्यावर टिका केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील बेबनाव समोर आला आहे. त्यामुळे नागपूर सभेआधी वज्रमुठ तुटण्याची शक्यता आहे.

गौतम अदानी यांच्या उद्योग समूहावर आरोप करणाऱ्या हिंडनबर्ग संस्थेचे नाव कधी ऐकलेले नव्हते, असे सांगतानाच, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनंतर आता संयुक्त संसदीय समितीच्या स्थापन करण्याची आवश्यकता राहिली नाही, असेही पवारांनी नुकतेच नमूद केले आहे. त्यामुळे काँग्रेसने शरद पवार यांच्यावर टिका केली आहे. पण यावेळेस ही टिका थेट हायकमांडकडून करण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या अखंडतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शरद पवार यांच्यावर टिका करताना काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या, “आज फक्त घाबरलेले, लोभी लोक त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी हुकूमशाही सत्तेचे गुणगान गात आहेत. एकटे राहुल गांधी देशातील जनतेची लढाई लढत आहेत. चोरांपासून भांडवलदार आणि चोरांना संरक्षण देणाऱ्या चौकीदाराविरुद्ध राहुल गांधी लढत आहेत’ अलका लांबा यांनी शरद पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाण साधला आहे. त्याचबरोबर अलका लांबा यांनी गौतम अदानी आणि शरद पवार यांचा एका इमारतीच्या गच्चीतला फोटो शेअर केला आहे. राहुल गांधींनी सातत्याने अदानींच्या शेल कंपनीत २०,००० कोटी रुपये आले कुठून?, हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच मुद्द्यामुळे काँग्रेसने संसदीय कामकाज देखील रोखून धरले होते. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही शरद पवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. शरद पवार यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत देखील बिघाडी होणार असल्याची राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलका लांबा यांच्या या ट्विटचा चांगलाच समाचार घेतला आहे. सत्ता येईल, जाईल पण काँग्रेसच्या एका नेत्याने गेले ३५ वर्ष त्यांच्यासोबत असलेल्या आणि चारावेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या एका ज्येष्ठ नेत्यावर अशा पद्धतीनं टीका करावी हे भयावह असल्याचं फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे पवार यांच्या मदतीला भाजपा धावल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!