शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करणारा अत्याधुनिक प्रणालीचा कचरा व्यवस्थापन प्रकल्प
प्रकल्प हडपसरमध्ये व्हावा' यासाठी आमदार चेतन तुपे पाटील पाठपुरावा करणार
पुणे दि १५(प्रतिनिधी)- जपान मधील योकोहामा शहरातील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिल्यानंतर आमदार चेतन तुपे पाटील यांचे सूतोवाच केले आहे. जपान अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विधिमंडळ सदस्य विविध ठिकाणी भेटी देत आहेत. आज योकोहामा शहरातील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिली.
या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर अत्याधुनिक शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून सिमेंट, वीज त्याचप्रमाणे रस्ता बांधणीसाठी लागणारा कच्चा माल तयार करण्यात येतो. या प्रकल्पात कुठेही कचरा दिसून येत नाही. संपूर्ण प्रकल्प स्वयंचलित यंत्रणेवर आधारित असून अतिशय स्वच्छ आणि नीटनेटक्या पद्धतीने चालविण्यात येतो. अशा प्रकारचा प्रकल्प हडपसर मध्ये साकारण्याची अत्यंत गरज असून याकामी मी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे असे आमदार चेतन तुपे पाटील यांनी सांगितले.