Latest Marathi News
Ganesh J GIF

घड्याळ चिन्ह राष्ट्रवादीचेच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

राज्यातील निवडणूकीपुर्वी राष्ट्रवादीची मोठी खेळी, निर्णयाने मोठा दिलासा

दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत पक्षाचा दर्जा नुकताच रद्द केला आहे. तरीही कर्नाटक विधानसभेची निवडणूक घड्याळ चिन्हावर लढण्यास निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला परवानगी दिली आहे.यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कर्नाटक निवडणुकीत मोठा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगानं काढून घेतला आहे. २३ वर्षानंतर राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला आहड. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा दर्जा आता महाराष्ट्र आणि नागालँड या दोन राज्यपुरता असणार आहे.त्यामुळे कर्नाटकात राष्ट्रवादीला कोणते चिन्ह मिळणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण राष्ट्रवादीला कर्नाटक निवडणुक घड्याळ चिन्हावर लढण्याची परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय फक्त या निवडणुकीपुरता मर्यादित आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आर हरी म्हणाले, “आम्ही कर्नाटक मध्ये ४६ जागांवर निवडणुका लढणार अहोत. राष्ट्रवादी कर्नाटक स्वबळावर लढणार आहे.इतर पक्षाचे विद्यमान आमदार राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच कर्नाटक निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या  पाच ते सहा सभा घेण्यात येणर आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान आहे. १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्यानंतर इतर राज्यांमध्ये जर त्यांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांना घड्याळ या चिन्हा व्यतिरिक्त दुस-या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षाला राजधानी दिल्लीत पक्ष कार्यालयासाठी जागा मिळते ती राष्ट्रवादीला आता मिळणार नाही.

निवडणूक आयोगाने २०१४, २०१९ च्या दोन लोकसभा निवडणुका आणि २०१९ नंतर २१ पैकी १२ राज्यात जिथे राष्ट्रवादी लढली तिथल्या कामगिरीच्या आधारे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेस, माकप या दोन पक्षांसह राष्ट्रवादी हा तिसरा पक्ष ठरलाय, ज्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने काढून घेतला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!