Latest Marathi News
Ganesh J GIF

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ ? जयंत पाटलांबाबत संजय शिरसाटांचा मोठा गौप्यस्फोट

MAHARASHTRA KHABAR NEWS |  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर सुद्धा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही रखडला आहे. यामागे नेमकं कारण काय याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत मोठं विधान केल आहे. जयंत पाटील भाजपसोबत येणार म्हणून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता असे तयांनी म्हंटल आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, जयंत पाटील अजित पवार गटासोबत येणार होते. हा प्रस्ताव त्यांनी पुण्यात दिला होता. तसेच आपण पवार साहेबाना याबाबत सांगू असेही त्यांनी म्हंटल होते. आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत मनाने अजित पवारांबरोबर आहेत. त्यामुळे जयंत पाटील येणार होते म्हणून विस्तार थांबला होता, असे शिरसाट म्हणाले आहेत. जयंत पाटील आता आमच्यासोबत अजून तरी आलेले नाहीत पण लवकरच ते येतील असा विश्वास सुद्धा संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उदघाटन सोहळ्यावरून भाजपवर निशाणा साधला होता, यावर सुद्धा संजय शिरसाट यांनी उत्तर दिले राम मंदिर उदघाटन सोहळा हा भाजपचा कार्यक्रम नाही. हा काही कोणत्या एका पक्षाचा कार्यक्रम नाही. राम मंदिर उभारणीसाठी प्रत्येक भारतीयांचा हात लागलेला आहे. त्यामुळे राम मंदिर उदघाटन सोहळा हा एक आनंदाचा क्षण असून, त्यात मिठाचा खडा कोणी टाकु नये असे संजय शिरसाट यांनी म्हंटल.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!