
स्टंट करताना गाडी आदळली आणि जाग्यावर जीव गेला
भयंकर अपघाताचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, हार्ट अटॅक की अपघात? स्टंट करताना गाडी हवेत उडाली आणि....
चेन्नई – साऊथ सिनेमा इंडस्ट्रीत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिग्दर्शक पा.रंजित आणि अभिनेता आर्या यांच्या आगामी सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना घडली आहे. या सेटवर कारचा स्टंट करताना प्रसिद्ध स्टंट आर्टिस्ट राजू(मोहनराज) याचा अपघाती मृत्यू झाला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
डायरेक्टर पा. रंजित, नागपट्टिनम येथे आगामी सिनेमा वेट्टूवम याचे शुटींग करत होते. त्याचवेळी स्टंट करताना सेटवर मोठी दुर्घटना घडली. स्टंटमॅन राजू एक एसयुव्ही गाडी चालवत होते, रॅम्पवरून गाडी वेगात जाते आणि ती उलटते. गाडी थेट खाली पडली आणि गाडीचा पुढील भाग जोराने जमीनीवर आपटला. राजू यांच्या निधनानंतर तमिळ अभिनेता विशाल यांनी दु:ख व्यक्त करत कठीण समयी स्टंट आर्टिस्टच्या कुटुबीयांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मी अनेक वर्षापासून त्यांना ओळखत होतो. त्यांनी माझ्या अनेक सिनेमात धोकादायक स्टंट केले होते. ते खूप धाडसी व्यक्ती होते. मी केवळ ट्विटच करत नाही तर त्यांच्या परिवाराला जितकं शक्य होईल, तितकं मदत करेन. कारण मी या चित्रपट इंडस्ट्रीतून आहे आणि त्यांनी अनेक चित्रपटांसाठी योगदान दिलं आहे…मी त्यांच्या परिवाराला सपोर्ट करेन.’असं त्यांनी म्हटले आहे. सध्या सोशल मिडीयावर अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
स्टंटमॅन राजू हे साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध, अनुभवी आणि धाडसी स्टंट आर्टिस्ट होते. कोणताही अवघड स्टंट ते धाडसाने करायचे. अनेक वर्षापासून ते इंडस्ट्रीत काम करत होते. आपल्या कामामुळे त्यांचा मोठा लोैकिक होता.