Latest Marathi News
Ganesh J GIF

सराईत गुन्हेगार फिरोज खानच्या मुलावर गुन्हा दाखल

पुणे –  बाप तुरुंगात असताना आता त्याचा मुलगा खंडणी मागत फिरु लागला असून लष्कर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अनस फिरोज खान  (रा. चुडामन तालीम, भवानी पेठ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी रुपेश सोपानराव डाके (वय ५१, रा. बाबाजान चौक, कॅम्प) यांनी फिर्याद  दिली आहे. हा प्रकार बाबाजान चौकाजवळील राजे चायनिज फास्ट फुडमध्ये  ३० जुलै व १ ऑगस्ट रोजी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश डाके यांचे राजे चायनिज फास्ट फुड आहे. अनस याचे वडिल फिरोज खान हा सराईत गुन्हेगार आहे. काही दिवसांपूर्वी तो तुरुंगातून जामिनावर सुटून आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा एकला खंडणी मागून घरात शिरुन मारहाण केली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली आहे. अनस खान हा ३० जुलै रोजी डाके यांच्या हॉटेलवर आला. त्याने रोज शंभर रुपये खंडणी देण्याची मागणी केली.
त्याला फिर्यादी यांनी नकार दिला.यावर त्याने ‘आब्बा जेलसे बाहेर आने के बाद हररोज पाचसौ रुपये लेके जाऊंगा,’ असे म्हणून निघून गेला.

यानंतर दुसर्‍या दिवशी तो पुन्हा आला. तो फिर्यादीला म्हणाला की, ‘चाचा तुम खयाल रखो. तुमने मुझे परसो पैसे नही दिये, तुमने गलत काम किया, मै तुमको रुपेश नही, रुपेश चाचा बोला हू,अभी मै तुमको दिखाता हू’ असे म्हणून फिर्यादीकडे पैशांची मागणी करुन शिवीगाळ करुन दमदाटी केली.

याप्रकरणी लष्कर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गायकवाड  तपास करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!