पुण्यातील 29 बोगस शाळांना लागणार टाळे लागणार आहे. शिक्षण विभागाने या 29 बोगस शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे तर 13 शाळांवर गुन्हा दाखल केला आहे.पुणे महानगर पालिकेच्या शिक्षण मंडळाने बोगस शाळांची आकडेवारी जाहीर केली आहे.पुण्यातील शिक्षण विभागान यंदा बोगस शाळांची आकडेवारी जाहीर केली आहे.या शाळांमध्ये काही गेल्या वर्षीच्या शाळांची नावे आली आहेत. त्यामुळे या शाळांची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यालगतच्या हवेली आणि मुळश तालुक्यात सर्वाधिक बोगस शाळा आहेत असे तपासणीत आढळले आहे. शाळेच्या व्यवस्थापनान या शाळेतील पालकांना सोयीचे ठरण्यासाठी गावातील प्रमुख चौकात शाळांची उभारणी केलेली आहे. प्रत्यक्षात शाळेचे कार्यालय भलत्याच ठिकाणी असल्याचे उघडकीस आले आहे. अनेक शाळा व्यावसायिक इमारतीत आहेत त्यांना मैदान नाही. तसेच काही शाळा चौथीपर्यंत मंजूरी मिळालेली असताना पुढील वर्ग सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. तर काही शाळांमध्ये कनिष्ठ वर्गाची परवानगी असताना पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक वर्ग बिनदिक्कत सुरु असल्याचे उघडकीस आले आहे.अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यास उशीर झाला असल्याने आता या शाळेत शिक्षणसत्र सुरु असलेल्या पालकांचे धाबे दणादणे आहेत. परंतू विद्यार्थ्याचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका
1 ) किड्स स्कूल शालीमार दाैंड
2 ) जिजाऊ एज्युकेशन सोसायटी अभंग शिशु विकास कासुर्डी, दौंड
3 ) यशश्री इंग्लीश मीडियम स्कूल,सोनवडी, दौंड
4) भैरवनाथ इंग्लीश मीडियम स्कुल, मोई, खेड
5) संस्कृती इंटरनॅशनल स्कुल, आंबेगाव खुर्द, हवेली
6) श्रीमती सुलोचनाताई झेंडे बाल विकास मंदिर,प्राथमिक विकास मंदिर, कुंजीरवाडी
7) रिव्हस्टोन इंग्लीश मीडियम स्कूल, पेरणे फाटा
8) सोनाई इंग्लीश मीडियम स्कूल, फुरसुंगी
9) श्रेयान इंटरनॅशनल स्कूल, साईनगर गहुंजे, ता.मावळ
10) व्यंकटेश्वरा