एका बाॅयफ्रेंडसाठी दोन मुलींमध्ये भरचाैकात हाणामारी
मुलींमध्ये मारामारी सुरु होताच बाॅयफ्रेंडने केले असे काही..
पैठण दि २७ (प्रतिनिधी)- ‘एक फुल दो माली’ ही हिंदीतील म्हण सगळ्यांनाच माहित आहे. एखाद्या मुलीच्या मागे जेंव्हा दोन तीन तरुण लागतात तेंव्हा ही म्हण सर्रास वापरली जाते.पण याच्या उलट घटना ऒैरंगाबाद मध्ये घडली आहे.त्या ठिकाणी एका बॉयफ्रेंडसाठी २ मुलींमध्ये भररस्त्यात मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पण ही मारामारी सुरू असताना बाॅयफ्रेंडने मात्र तेथून पळ काढला होता.
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील ही घटना आहे. या दोन्ही मुली एकाच मुलावर प्रेम करत होत्या. यातील एका मुलीने बॉयफ्रेंडसोबत दुसऱ्या मुलीला पाहिल तेव्हा तिचा राग अनावर झाला. सुरुवातीला दोन्ही मुलींमध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका टोकाला गेला की, दोन्ही मुली भररस्त्यात एकमेकींना भिडल्या. या मुलींमध्ये मारामारी सुरु होताच बॉयफ्रेंडनं तेथून काढता पाय घेतला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही मुलीचा बॉयफ्रेंड एकच होता त्याचवरून दोन्ही मुलींमध्ये मारामारी झाली. सकाळी बॉयफ्रेंड दुसऱ्या मुलीसोबत बसस्टँडवर असल्याचं कळालं तेव्हा दुसरी मुलगी त्याठिकाणी पोहचली. बॉयफ्रेंडसमोरच त्या मुलींमध्ये वाद झाला. हा वाद सोडवण्याचा बॉयफ्रेंड प्रयत्न करत होता. परंतु दोघीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. वाद वाढतच गेला आणि दोन्ही एकमेकींना मारहाण करू लागल्या. हा प्रकार काहींना पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत मुलींना ताब्यात घेतले आहे.
एकाच मुलावर प्रेम करणाऱ्या दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन पोलीसांनी पोलीस स्टेशनला आणलं. याठिकाणी मुलींची चौकशी करून त्यांना पुन्हा घरी पाठवले आहे. सध्या तरी पोलीसांनी हस्तक्षेप केल्यामुळे हा वाद मिटला आहे. पण भरचाैकात एका मुलासाठी दोन मुलींमधली मारामारी चर्चेचा विषय ठरली आहे.